लार्सा
इराकमधील एक प्राचीन शहर. बॅबिलोनिया साम्राज्याच्या राजधान्यांपैकी हे एक ठिकाण आग्नेय इराकमध्ये नासिरिया शहराच्या वायव्येस ४८ किमी. व ऊरूक (ईरेक) शहराच्या आग्नेयीस २१ किमी. वर युफ्रेटीस नदीच्या डाव्या काठावर वसले होते. बायबलमध्ये याचा एल्-ले-सार असा उल्लेख आढळतो. सांप्रतचे टॉल संकराह म्हणजेच लार्सा असावे, असा तज्ञांचा कयास आहे.